सुनिताताईंनी प्रभागातील उद्यानांचे सुशोभीकरण आणि नागरिकांच्या आरोग्यवर्धनासाठी उद्यान विकासाचे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी उद्यानात नागरिकांच्या विश्रांतीसाठी आणि बसण्यासाठी आकर्षक मेघडंबरी उभारण्यात आली आहे, ज्यामुळे उद्यानाला नवे सौंदर्य प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर शाहू पक्षी विहार उद्यानातील वॉकिंग ट्रॅकची दुरुस्ती केली. तेथील शिव-पार्वती मंदिरासमोर दीपस्तंभ उभे करून उद्यानाच्या सौंदर्यात भर घातली. तसेच आरोग्यप्रेमींसाठी ओपन जिमचे आधुनिक साहित्य बसविण्यात आले आहे.