जनतेसाठी उभारलेले विश्वासाचे केंद्र जनसेवा ही केवळ घोषणा नसून कृतीत उतरलेली मूल्यप्रणाली आहे, याच तत्त्वावर सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांनी “सम्यक विहार व विकास केंद्र” हे जनसंपर्क कार्यालय स्थापन केले. या केंद्राचे उद्घाटन तत्कालीन महापौर केंद्रीय राज्यमंत्री ना. मा. मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांच्या दैनंदिन समस्यापाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, निवास, वीज इत्यादी विषयांवर तत्परतेने कार्यवाही करण्यात आली. तसेच येथे महिलांसाठी कौशल्यविकास शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि विविध सामाजिक उपक्रम नियमित राबवले जातात. हे केंद्र आज औंध-बोपोडी प्रभागातील जनतेसाठी एक विश्वासाचे प्रतीक बनले आहे. जिथे प्रत्येक तक्रारीस उत्तर आणि प्रत्येक नागरिकाला आधार मिळतो. आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेले हे केवळ संपर्क कार्यालय नसून औंध-बोपोडी प्रभागातील नागरिकांसाठी एक उर्जास्थान बनले आहे