भारतीय रिपब्लिकन पक्ष

समाजमंदिर, बुद्धविहार वामनदादा कर्डक साहित्य कट्टा

सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या पुढाकाराने व आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून प्रभागात विविध समाजमंदिरांची आणि बुद्धविहारांची उभारणी तसेच दुरुस्ती करण्यात आली. या ठिकाणी समाजातील विविध घटकांसाठी सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. या उपक्रमांमुळे समाजामध्ये बंधुत्व, एकोपा आणि संवादाची परंपरा अधिक दृढ झाली आहे. औंध परिसरात वामनदादा कर्डक साहित्य कट्टा उभारण्यात आला असून, तो स्थानिक कवी, लेखक आणि साहित्यप्रेमींसाठी एक प्रेरणास्थान ठरला आहे. या सर्व उपक्रमांमधून सुनिताताईंनी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे काम केले असून, प्रभागाला सांस्कृतिक समृद्धीचा आणि सामाजिक ऐक्याचा केंद्रबिंदू बनवले आहे.

Scroll to Top