गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि शालेय साहित्य वाटप उपक्रम शिक्षण, प्रेरणा आणि उज्ज्वल भविष्य आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून प्रभागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टी निर्माण करण्यासाठी सौ. सुनिता परशुराम वाडेकर दरवर्षी 10 वी आणि 12 वी. यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करतात. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात येतात. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, बॅग, पुस्तके आणि आवश्यक साहित्याचे वाटप केले जाते. या उपक्रमातून शिक्षण हेच परिवर्तनाचे माध्यम आहे हा संदेश देत त्यांनी अनेक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणेचा किरण जागवला आहे.