बोपोडीच्या हृदयस्थानी असलेल्या चौकात राजर्षी शाहू चौकाची उभारणी करून सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांनी आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून सामाजिक समतेचा संदेश देणारा उपक्रम » लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्य कट्टा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या भव्य शिल्प भिंतीची निर्मिती, अशोक स्तंभाची उभारणी केली. या साहित्य कट्याचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले यांच्या हस्ते झाले प्रसंगी ना. मुरलीधर मोहोळ, आ. सिद्धार्थ शिरोळे व विविध समाजाचे नागरिक उपस्थित होते. हा उपक्रम केवळ सौंदर्यवर्धनासाठी ‘ नसून ‘सामाजिक न्याय, शिक्षण आणि समतेच्या विचारांचा शाश्वत संदेश देणारा आहे. या स्मारकामुळे बोपोडी परिसर एक प्रेरणास्थळ बनला असून नागरिकांमध्ये अभिमानाची भावना जागवणारा ठरला आहे. राजर्षी शाहू चौकात दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात पार पडते यावेळी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली होती