भारतीय रिपब्लिकन पक्ष

रक्तदान शिबीर व कोरोना योध्दा सन्मान

समाजसेवा आणि कृतज्ञतेची भावना सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने समाजहिताचा एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या दिवशी मोठ्या उत्साहात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये अनेक स्वयंसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभाग घेतला. समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखत या शिबिरातून जीवनदायी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित झाले. याच कार्यक्रमात चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमधील पोलिस अधिकाऱ्यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आला. समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र लढणाऱ्या या पोलिसांना आदराचा मान देत सौ. सुनिताताईनी समाजातील सेवा आणि कृतज्ञतेचा सुंदर संदेश दिला. आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून राबवलेले हे उपक्रम संकटाच्या काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत याची
ग्वाही देतात

Scroll to Top