भारतीय रिपब्लिकन पक्ष

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आदरांजली कार्यक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोपोडीतील शाहू चौकात भव्य आदरांजली कार्यक्रम आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आयोजित आयोजित करण्यात येतो .या प्रसंगी प्रभागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. व महामानवाला आदरांजली वाहतात मागील वर्षीच्या कार्यक्रमात आ. सिद्धार्थ शिरोळे यांची विशेष उपस्थिती लाभली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि सामाजिक न्यायाच्या संदेशाला वंदन करण्याचा हा सोहळा अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी या दिवसाचे स्मरण करत ‘ज्ञान, समता आणि बंधुता’ वा डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.

Scroll to Top