अंतर्गत सोयी सुविधा नागरिकांसाठी डीपी रोड औंध येथील ड्रेनेज, पाण्याची पाईप लाईन दुरुस्ती खडकी ते रेंज हिल्स बोगदा मोठा करण्याचे काम सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यामुळे औंध डीपी रोड परिसरातील मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी ड्रेनेज लाईनची दुरुस्ती, पाणी पाईपलाईन सुधारणा आणि सार्वजनिक शौचालयांचे नूतनीकरण ही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच खडकी ते रेंजहिल्स बोगदा मोठा करण्याचे काम सध्या सुरू असून, या प्रकल्पामुळे पुढील काळात वाहतूक कोंडी कमी होऊन प्रभागातील संपर्क सुविधा अधिक सुकर व सुरक्षित होणार आहेत. या सर्व उपक्रमांमुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवा वेग मिळत आहे.