संकटसमयी आधाराचा हात बोपोडी परिसरात पाऊस जास्त झाल्यावर पूरस्थिती निर्माण. बोपोडी परिसर नदीकाठी असल्याने पाऊस जास्त झाल्यावर पूरस्थिती निर्माण होवून आदर्शनगर व काही सोसायटी मध्ये पाणी शिरते, अशा वेळी नागरिकांच्या मदतीसाठी सौ. सुनिता परशुराम वाडेकर आणि आयु. परशुराम वाडेकर नेहमीच अग्रभागी उभे राहिले आहेत. पाण्याखाली गेलेल्या वस्त्यांमधील लोकांचे स्थलांतर, अन्न व पिण्याच्या पाण्याचे वाटप, तसेच औषध आणि आवश्यक वस्तूंची उपलब्धता यासाठी त्यांनी दिवस- रात्र अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या कृतीमुळे पूरग्रस्तांना सुरक्षितता आणि आधार मिळाला, तर समाजात “संकटात माणुसकीचं खरं दर्शन घडविणारे नेतृत्त्व म्हणून त्यांची बनली आहे.