भारतीय रिपब्लिकन पक्ष

दिवाळी फराळ कष्टकरी व रिक्षाचालक यांच्यासोबत

आशेच्या दिव्यांनी उजळलेली दिवाळी प्रभागातील समाजघटकांमध्ये एकोपा आणि आत्मीयतेचा संदेश देण्यासाठी आयु. परशुराम | वाडेकर व सौ. सुनिता परशुराम वाडेकर दरवर्षी दिवाळी स्नेहभेट समारंभ आयोजित करतात. विशेष म्हणजे हा समारंभ सफाई कर्मचारी, रिक्षाचालक आणि कष्टकरी कामगार नागरिक या समाजाच्या आधारस्तंभांसाठी असतो. त्यांच्या हातात दिव्याचा प्रकाश देऊन, मिठाई व भेटवस्तूंचे वाटप करून सुनिताताईनी या दिवाळीला मानवी कृतज्ञतेचा सण बनवला आहे. हा उपक्रम समाजात समानतेचा आणि माणुसकीचा खरा प्रकाश पसरवतो.

Scroll to Top