भारतीय रिपब्लिकन पक्ष

तथागत गौतम बुध्द धम्म विपश्यना केंद्र व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोफत अभ्यासिका

अंतर्मनशांतीचा प्रवास औंध – बोपोडी प्रभागात पुणे विद्यापीठाच्या जनरल बी. सी. जोशी प्रवेशद्वाराजवळ > उभारण्यात आलेले धम्म विपश्यना केंद्र आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून हे नागरिकांना मनःशांती, आत्मचिंतन आणि ध्यान साधनेचा अनुभव देणारे पवित्र स्थळ आहे. या केंद्राचे उद्घाटन ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले असून, प्रभागातील नागरिक मोठ्य संख्येने उपस्थित होते. सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या पुढाकाराने साकारलेले केंद्र पुण्यातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनाला नवी दिशा देते. तसेच येथे तरुण विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेली मोफत अभ्यासिका आणि समृद्ध ग्रंथालय हे अभ्यासासाठी शांत, सुरक्षित आणि प्रेरणादायी वातावरण प्रदान करते. येथे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा, वाचन साहित्य आणि मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या धम्म विपश्यना केंद्रास केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले यांनी भेट देवून उपक्रमाचे कौतुक केले

Scroll to Top