भारतीय रिपब्लिकन पक्ष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोफत व्यायामशाळा

तरुणांसाठी आरोग्य खेळाडू घडविण्याचं केंद्र आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून तरुण पिढीमध्ये आरोग्याविषयी जागरूकता आणि शारीरिक तंदुरुस्तीची सवय निर्माण व्हावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोफत व्यायामशाळा उभारण्यात आली आहे.येथे परिसरातील युवकांसाठी आधुनिक जिम उपकरणे, प्रशिक्षक मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक सत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच औंध रोड वेणूवन बुद्ध विहाराजवळील व्यायामशाळेस साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. स्थानिक क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंसाठी उभारण्यात आलेले हॉकी स्टेडियम हे प्रभागातील तरुणांना खेळ क्षेत्रात संधी, प्रशिक्षण आणि व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. या हॉकी स्टेडियमला भविष्यात ‘प्रगत मैदान व स्पोर्ट्स हब’ बनवण्याचा संकल्प परशुराम वाडेकर यांचा आहे. येथे नियमित हॉकी स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे आणि क्रीडा उपक्रम आयोजित केले जातात. सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या प्रयत्नातून साकारलेली ही व्यायामशाळा प्रभागातील युवकांसाठी प्रेरणादायी आरोग्यकेंद्र ठरली आहे.

Scroll to Top