जनतेच्या समस्यांसाठी प्रशासनाचा सतत पाठपुरावा. प्रभागातील कोणतीही समस्या लहान-मोठी असो, सौ. सुनिताताई वाडेकर व आयु परशुराम वाडेकर, दोघांनी नेहमीच प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतात. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज चे प्रश्न, पूरपरिस्थिती, शाळा किंवा नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारी प्रत्येक मुद्द्यावर त्या सक्रियपणे प्रशासनाशी संवाद साधतात आणि महापालिकेत जनतेचा आवाज ठामपणे मांडतात. त्यांच्या या कार्यशैलीमुळे ‘जनतेच्या समस्या म्हणजेच माझ्या स्वतःच्या समस्या’ असा भाव निर्माण झाला असून, प्रभागात सुलभ प्रशासन आणि लोकसंपर्काचे जिवंत उदाहरण म्हणून त्या ओळखल्या जातात.