भारतीय रिपब्लिकन पक्ष

छ. शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाची उभारणी

औंध परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक भान जपणान्या महत्त्वपूर्ण उपक्रमांपैकी एक म्हणजे डीपी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणीचे काम. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे, प्रबोधनाचा संदेश देणारे आणि पुढील पिठ्यांना प्रेरणा देणारे हे कार्य आयु. परशुराम वाडेकर आणि सौ. सुनिता वाडेकर यांच्या पुढाकाराने आगामी काळात यशस्वीरीत्या पूर्ण होणार आहे. बोपोडी परिसरातील नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हे फक्त विश्रांतीचे स्थळ नसून प्रेरणा, शौर्य आणि संस्कारांचा संदेश देणारे केंद्र बनावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. हे महत्वपूर्ण व प्रतिष्ठेचे काम आयु. परशुराम वाडेकर आणि सौ. सुनिता वाडेकर यांच्या पुढाकाराने यशस्वीपणे पूर्ण होणार आहे

Scroll to Top