भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रभागात देशभक्ती आणि अभिमानाची भावना जागवणारा उपक्रम राबविण्यात आला. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या पुढाकाराने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले, ज्यात शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि युवक उत्साहाने सहभागी झाले. या रॅलीच्या माध्यमातून स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानाची आठवण ताजी करण्यात आली, तर युद्धात हातपाय गमावलेल्या वीर सैनिकांचा सन्मान करून त्यांच्या त्यागाला सलाम करण्यात आला. या कार्यक्रमातून देशभक्तीचा उत्साह आणि समाजात ‘सेवा आणि देशासाठी योगदान हेच खरे देशप्रेम’ हा संदेश पोहोचविण्यात आला. आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या या उपक्रमामुळे पुण्यामध्ये देशभक्तीची प्रेरणा मिळाली.