भारतीय रिपब्लिकन पक्ष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा

उत्साहाचा आणि ऐक्याचा पर्व आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आंबेडकर फेस्टिवलची पुण्यात मोठी परंपरा निर्माण झाली आहे. आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे, प्रकाश पाटणकर, विठ्ठल उमप, अनिरुद्ध बनकर यासारख्या दिग्गजांनी या फेस्टीवलमध्ये आपली कला सादर केली आहे या सोहळ्यात लहानांपासून थोरांपर्यंत, महिला, युवक, विद्यार्थी, आणि मान्यवर नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग असतो. दरवर्षीचा हा सोहळा म्हणजे सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक विविधता आणि आंबेडकरी चळवळीच्या तेजाचे प्रतीक बनला आहे. प्रभागात दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा आयु. परशुराम वाडेकर यांच्या प्रयत्नातून अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. हा केवळ उत्सव नसून, समता, बंधुता आणि प्रगतीच्या मूल्यांना उजाळा देणारा एक सामाजिक सोहळा असतो. सोहळ्याची सुरुवात भव्य मिरवणुकीने होते ड्ड सजवलेल्या रथांवर, डॉ. आंबेडकरांच्या भव्य पुतळ्यासमोर, डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई, सांगीतिक कार्यक्रम, पारंपरिक ढोल-ताशे, आणि आधुनिक लाईट व साऊंड शो यांच्या साथीत संपूर्ण परिसर आनंदमय वातावरणाने दुमदुमतो.

Scroll to Top