लोकशाहीच्या मूल्यांसाठी एक प्रेरणादायी पाऊल. आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित केली जाणारी ‘संविधान दौड’ ही लोकशाही, समानता आणि संविधानाच्या मूल्यांप्रती जनजागृती निर्माण करणारी एक भव्य परंपरा बनली आहे. या दौडीत पुणे शहरातील हजारो नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवक आणि Paramedical (दिव्यांग) सैनिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. विशेष म्हणजे या उपक्रमात जगभरातील विविध देशांतील स्पर्धकही सहभागी होतात. संविधान सायकल मार्च संविधानातील विचारांचे फलक घेऊन सायकलस्वारांनी संविधान आमचा अभिमान हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. आयु. परशुराम वाडेकर यांच्या पुढाकाराने झालेले हे उपक्रम आज एकतेचा, जागरूकतेचा आणि भारतीय संविधानाचा उत्सव म्हणून ओळखली जाते.