भारतीय रिपब्लिकन पक्ष

नेत्यांशी संपर्क.. जनतेच्या प्रश्नासाठी

सुनिता परशुराम वाडेकर व आयु. परशुराम वाडेकर हे नेहमीच जनतेच्या प्रश्नांच्या निवारणासाठी तत्पर आणि सक्रिय राहिल्या आहेत. प्रभागातील लहान मोठ्या समस्या असोत किंवा विकासकामांबाबतचा पाठपुरावा त्या नेहमी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशी थेट संपर्क साधून त्या प्रश्नांचे समाधान मिळवतात. सततचा संवाद, बैठका आणि प्रत्यक्ष भेटी यांच्या माध्यमातून त्या प्रभागाच्या विकासासाठी आवश्यक निधी योजना आणि प्रकल्पांना चालना देतात. त्यांच्या या प्रयत्नांमुळे नागरिकांच्या अनेक समस्या मार्गी लागल्या असून, प्रभागाच्या प्रगतीला नवी गती मिळाली आहे. सुनिताताईची ही कार्यपद्धती ‘संपर्कातून समाधान, आणि समाधानातून विकास’ अशी ओळख निर्माण करते.

Scroll to Top