भारतीय रिपब्लिकन पक्ष

भिडे वाडा स्मारकासाठी सातत्यपूर्ण लढा

भिडे वाडा म्हणजे देशातील पहिली मुलींची शाळा. पुण्यातील भिडे वाडा हे भारतीय इतिहासातील एक सुवर्ण पान आहे, कारण याच ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून शिक्षणक्रांतीचा पाया घातला. या ऐतिहासिक वास्तूचे स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी आयु. परशुराम वाडेकर यांनी सर्वात प्रथम पुढाकार घेतला. त्यांनी या कामासाठी आंदोलन, मोर्चे आणि जनजागृती करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या सोबत सुनिता परशुराम वाडेकर यांनीही या चळवळीत सक्रिय सहभाग घेत विविध आंदोलनांत भाग घेतला. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिपाक म्हणजेच, सुनिता वाडेकर पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौर झाल्यानंतर भिडे वाडा स्मारकाच्या कामाला अखेर मंजुरी मिळाली. हा लढा केवळ एका इमारतीसाठी नव्हता तर महिला शिक्षण, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या मूल्यांसाठी होता.

Scroll to Top