प्रभागाच्या व एकंदरीत पुणे शहराचा वाहतूक व्यवस्थेला दिलासा देणारे एक महत्त्वपूर्ण काम म्हणजे बोपोडी चौक ते खडकी स्टेशन दरम्यानच्या हायवे रस्त्याचे रोड वावडनिंग म्हणजेच महामार्ग रुंदीकरण वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला हा प्रकल्प सौ. सुनिता परशुराम वाडेकर व आयु. परशुराम वाडेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास गेला. या कामामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी झाली, रस्त्यांची सुरक्षितता वाढली आणि प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. आज हा विस्तारित हायवे मार्ग प्रभागाच्या विकासाचा कणा आणि सुचारू वाहतुकीचा आदर्श नमुना ठरला आहे. या रस्त्यावर वारंवार अपघात होत होते. आयु. परशुराम वाडेकर यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम पूर्ण झाले व वाहनचालकांनी मोकळा श्वास घेतला