कोरोना काळात अनेक बालकांनी आपल्या आई- वडिलांचे छत्र गमावले, आणि त्यांच्या आयुष्यात काळोख पसरला. त्या वेळी आयु. परशुराम वाडेकर व सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांनी खऱ्या अर्थाने आईचा ममत्वपूर्ण स्पर्श दिला. त्यांनी या मुलांसोबत दिवाळी साजरी करत अन्न, कपडे, आणि गिफ्ट्सचे वाटप केले. या उपक्रमास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील उपस्थित होते यावेळी अजून एक मोठं पाऊल उचलत दत्तक योजना राबवली ज्यायोगे या मुलांना सुरक्षित आयुष्याची हमी मिळाली. तसेच भाऊबीजेचा कार्यक्रमही साजरा केला त्यांच्या या कृतीतून सामाजिक जबाबदारी, करुणा आणि मातृत्व यांचा सुंदर संगम दिसून आला.