भारतीय रिपब्लिकन पक्ष

सकंटात माणुसकीचा हात

जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचे वाटप. कोरोना महामारीच्या भीषण काळात जेव्हा सर्वत्र अनिश्चितता आणि भीतीचे वातावरण होते, त्या काळात आयु. परशुराम वाडेकर व सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांनी खऱ्या अर्थाने जनसेवेचे उदाहरण घालून दिले. कोरोन काळात सर्व उद्योग धंदे बंद होते. लोकांच्या हाताला काम नव्हते. अशावेळी औंध-बोपोडी प्रभागातील रिक्षाचालक, कामगार वर्ग, झोपडपट्टीतील नागरिक आणि समाजातील दुर्बल घटक यांच्यापर्यंत त्यांनी स्वतः जाऊन अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचे वाटप केले. त्यांच्या या कार्यामुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला आणि ‘राजकारण म्हणजे सेवा’ ही संकल्पना वाडेकर दाम्पत्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली.

Scroll to Top