भारतीय रिपब्लिकन पक्ष

महामानवांच्या जयंती

सांस्कृतिक एकतेचा व सामाजिक प्रेरणेचा दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसोबतच महामानवांच्या जयंती साजऱ्या करून त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भगवान गौतम बुद्ध, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर, महर्षी वाल्मिकी, संत गाडगे बाबा, माता रमाबाई आंबेडकर तसेच मुहम्मद पैगंबर, गुरु नानकदेव, भगवान बिरसा मुंडा, संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम, समाजप्रबोधनाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमधून समानता, न्याय, शिक्षण, स्वाभिमान आणि सेवा यांचे मूल्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम व आयु. परशुराम वाडेकर व सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांनी सातत्याने केले आहे. या जयंती उत्सवांमुळे सांस्कृतिक एकतेचा व सामाजिक प्रेरणेचा माहोल निर्माण होतो.

Scroll to Top