८ मार्च जागतिक महिला दिन या निमित्ताने प्रभागात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाचा कर्तुत्वान मातां आणि महिलांचा गौरव करण्यासाठी माता सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्कार’ वितरण सोहळा भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात शिक्षण, सामाजिक कार्य, आरोग्य, कला आणि उद्योजकता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे हा सन्मान अभिनेत्री शिवानी रांगोळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश महिलांच्या कर्तृत्वाचा सम्मान, प्रेरणादायी कथा समाजासमोर आणणे आणि नव्या पिढीला प्रेरणा देणे हा होता. या सोहळ्याचे आयोजन सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले. आयु. परशुराम वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली ‘खीशक्तीचा गौरव आणि समाजात तिच्या योगदानाचे कौतुक’ या भावनेला प्रत्यक्ष रूप देण्यात आले.