गत १९ वर्षांपासून “धम्म पहाट” हा सांगीतिक सोहळा दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने पुण्यात अत्यंत सांस्कृतिक वातावरणात साजरा केला जातो. या कार्यक्रमात लोकगीते, भजन आणि शास्त्रीय गायनाचे सादरीकरण होत असून, संगीतप्रेमी पुणेकरांसाठी ही एक आध्यात्मिक व सांस्कृतिक मेजवानी ठरते. या कार्यक्रमात भारतातील नामवंत गायक व वादक आपली कला सदर करतात या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे धम्म, कला आणि संस्कृती यांचा संगम घडवून समाजात शांतता, प्रेरणा आणि सकारात्मकता निर्माण करणे. विश्वभूषण डॉ.बाबासासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव
समिती पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांच्या पुढाकाराने व संकल्पनेतून सुरू झालेली ही परंपरा आज पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीचा अभिमानास्पद भाग बनली आहे.