आयु. परशुराम वाडेकर आणि सौ. सुनिताताई यांचे चळवळीतील योगदान आयु. परशुराम वाडेकर हे बहुजनांच्या न्याय, अधिकार आणि सन्मानासाठी लढणारे ध्येयवेडे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी अन्यायाविरुद्ध आणि सामाजिक समतेसाठी अनेक मोर्चे, धरणे आणि आंदोलने उभारली.त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या चळवळींनी शोषित, वंचित आणि मागास समाजघटकांना आपला आवाज उठवण्याचे धैर्य दिले. खैरलांजी हत्याकांड विरुद्ध केलेले आंदोलन असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी दिलेला लढा असो, अल्पसंख्यांकांचे प्रश्नासाठी केले आंदोलन अथवा भिडे वाडा स्मारकासाठी केलेले आंदोलन यामध्ये त्यांनी अन्यायाविरुद्ध नेहमीच आवाज उठवलेला आहे. तसेच त्यांच्या प्रत्येक चळवळीत सुनिताताई परशुराम वाडेकर यांचा सक्रिय सहभाग राहिला. महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांनी आघाडी घेतली आणि आंदोलनांना सामाजिक एकतेचा आणि जनतेच्या प्रश्नांचा आवाज दिला.