भारतीय रिपब्लिकन पक्ष

आषाढी वारी व तुकाराम महाराज पालखी सोहळा – स्वागत

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या आषाढी वारी निमित्त दरवर्षी संत शिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात केले जाते. यावेळी औंध – बोपोडी परिसरातील ह.भ.प. महाराज व वारकरी मंडळांचा सत्कारही केला जातो.
या पवित्र प्रसंगी सौ सुनिता व आयु. परशुराम वाडेकर यांच्या वतीने बोपोडी परिसरात वारकऱ्यांसाठी फराळ, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, मसाज आणि विश्रांतीची व्यवस्था केली जाते. या उपक्रमातून त्यांनी वारकरी संप्रदायाच्या सेवा, श्रद्धा आणि समर्पण या तीन तत्त्वांना आदरांजली वाहिली आहे. भक्ती आणि सेवाभावाचा सुंदर संगम साधत, सुनिताताईच्या या कार्यामुळे बोपोडी परिसर वारकरी परंपरेच्या आदर आणि आदरातिथ्याचा केंद्रबिंदू बनला आहे.
आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून उभी केलेली विठू माउलीची मूर्ती वारीमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली

Scroll to Top