भारतीय रिपब्लिकन पक्ष

तक्षशिला बुध्द विहार व श्री महादेव मंदिर धार्मिक समतेचा संदेश देणारा उपक्रम

सामाजिक एकोपा आणि सर्वधर्मसमभाव या भारतीय संस्कृतीच्या मूलमंत्राला अधोरेखित करत सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांनी बोपोडीमधील रेल्वेलाईन गेट नं २० येथे तक्षशिला बुद्ध विहार आणि श्री शिव मंदिर उभारण्याचा पवित्र उपक्रम हाती घेतला. आ. सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते दोन्ही उपक्रमाचे उद्घाटन झाले. या स्थळांच्या निर्मितीमुळे परिसरात शांती, श्रद्धा आणि ऐक्याच वातावरण निर्माण झाले आहे.

सुनिताताई व आयु. परशुराम वाडेकर यांनी स्वखर्चातून या मंदिर व बुद्ध विहाराची उभारणी करत बुद्धांच्या करुणावादाचा आणि शिवाच्या शक्तीचा संगम घडवून सांस्कृतिक समृद्धी आणि सामाजिक समता यांचा सुंदर संदेश दिला आहे.

आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून समाजात धर्म हा विभाजन नव्हे, तर मूल्यांचा पूल आहे हा संदेश दिला गेला

Scroll to Top