भारतीय रिपब्लिकन पक्ष

राजमाता जिजाऊ ग्रंथालय व अभ्यासिका

आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र निमित्ताने सुनिता परशुराम वाडेकर यांनी बोपोडीमधील भोईटे चाळ परिसरात “राजमाता जिजाऊ वाचनालय आणि अभ्यासिका ” उभारण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबवला. या वाचनालयाचे उद्घाटन समारंभास आ.सिद्धार्थ शिरोळे यांची प्रमुख उपस्थिती होती तर उद्घाटन माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांच्या हस्ते झाले या वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी शांत अभ्यासाची सुविधा, विविध विषयांवरील पुस्तके आणि मार्गदर्शन सत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमातून सुनिताताईंनी “ज्ञान हेच खरे शस्त्र आणि वाचन हीच खरी शक्ती” हा संदेश देत तरुण पिढीमध्ये वाचनसंस्कृती जागवली.

Scroll to Top