भारतीय रिपब्लिकन पक्ष

भव्य कमान व अशोक स्तंभ

शिक्षण आणि संविधान मूल्यांची जपणूक हीच खरी राष्ट्रसेवा मानून सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांनी माता रमाबाई आणि डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक विद्यालयाच्या आवारात भव्य प्रवेशद्वार (कमान) उभारली. हि कमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कमानीपासून प्रेरणा घेवून बनवली आहे. या सोबतच शाळेच्या परिसरात अशोक स्तंभ आणि भारतीय संविधानाची उद्देशिका स्थापून विद्याथ्र्यांमध्ये राष्ट्रभावना आणि लोकशाही मूल्यांची जाणीव जागवली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कमानीची प्रेरणा या कमानीतून दिसून येते. आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे उद्घाटन तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ व आ. सिद्धार्थ शिरोळे यांच्या शुभहस्ते झाले. सुनिताताईच्या या प्रयत्नांमुळे बालवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये अभिमान, जबाबदारी आणि भारतीयत्वाची जाणीव दृढ झाली आहे शिक्षणासोबत संस्कार देणारा हा उपक्रम यांच्या कार्याचा उज्वल ठसा ठरला आहे.

Scroll to Top