प्रकाश, समानता आणि एकतेचा भाव प्रभागातील सर्व मंदिर व धार्मिक उपासना स्थळांसमोर सौहार्द आणि ऐक्याचा संदेश दृढ करण्यासाठी प्रत्येक मंदिर आणि चर्चच्या बाहेर आकर्षक दीपस्तंभांची उभारणी करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश – समाजातील सर्व घटकांना प्रकाश, समानता आणि एकतेचा भाव देणे. धार्मिक स्थळांबाहेर प्रज्वलित होणारा हा दीप केवळ प्रकाशाचा नाही, तर सौहार्द आणि सामूहिक विकासाच प्रतीक आहे. सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या प्रयत्नातून राबविण्यात आलेल्या या कार्यामुळे प्रभागात धर्मनिरपेक्षतेचा आणि सामाजिक ऐक्याचा नवा आदर्श निर्माण झाला आहे. आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून बनलेले हे उपक्रम छोटे असले तरी यामुळे औंध – बोपोडीच्या प्रभागाच्या सौंदर्यात भर घालणारे आहेत