विचारांचा आणि प्रेरणेचा शाश्वत दीपस्तंभ आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून आणि सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या प्रयत्नांमुळे पुणे महानगरपालिकेच्या आवारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आणि प्रेरणादायी शिल्प उभारण्यात आले. भूतकाळात ज्या महानगरपालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान नाकारला तेथे प्रवेशद्वारावर हे स्मारक बसवून त्यांना खरी आदरांजली वाहिली. हा केवळ एक पुतळा नसून सामाजिक समता, समाज परिवर्तन, समानता आणि न्याय यांच्या विचारांचे प्रतीक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शाना पुढे नेण्याच्या भावनेतून उभे राहिलेले हे स्मारक विद्यार्थ्यांना, अधिकारी वर्गाला आणि नागरिकांना दररोज प्रेरणा देत राहते. या पुतळ्याचे उद्घाटन भारताचे गृहमंत्री ना. अमित शहा यांच्या हस्ते झाले. प्रसंगी ना. रामदासजी आठवले, ना. चंद्रकांत पाटील तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ, आयु. परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते. अभिमानाची बाब म्हणजे बाबासाहेबांच्या स्मारकासोबतच तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ व उपमहापौर सौ. सुनिता वाडेकर यांच्या प्रयत्नातून छ. शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण गृहमंत्री अमित शहा यांच्या झाले.